Share

“जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा”, नवाब मलिकांचा रवी किशन यांना टोला

Published On: 

मुंबई: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीमुळे महाराष्ट्रातील राजकारणही चांगलेच तापताना दिसून येत आहे. पक्षबदली, तिकीट, मतदार संघ तर कधी शाब्दिक वाद यामुळे उत्तर प्रदेश निवडणूक चांगलीच रंगताना दिसत आहे. सध्या उत्तर प्रदेशात दलित किंवा ओबीसी मतं महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने त्यांना आकर्षित करण्याचा सर्वच पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान नवाब मलिक (NCP leaders Nawab Malik)यांनी अभिनेते रवी किशन ( Ravi Kishan )यांचा एक फोटो शेअर करत त्यांना चांगलाच टोला लगावला आहे.

सबका साथ सबका विकास असं म्हणत रवी किशन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. एका दलित व्यक्तीच्या घरी भोजन करतानाचा फोटो त्यांनी पोस्ट केला होता.  यावरूनच नवाब मलिक यांनी टीका केली आहे. ‘पत्रावळ, सलाद, पुरी आणि भाजी दर्शवते की, माल रसोईचा आहे. दलित लोट्यात पाणी पिणार तर अभिनेता कागदी ग्लासमध्ये. वाह…बचवा वाह..‘ज़िंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा’असे ट्वीट नवाब मलिक यांनी केले आहे.

यासोबतच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही फोटो ट्वीट केला आहे. ज्यात म्हटले आहे की, ‘पत्रावळी-कुल्हड दर्शवते आहे की, दलितच्या घरी भोजन एकमात्र दिखावा आहे. ऐकले आहे की, स्वयंपाकघर आणि भोजन ची व्यवस्थाही भाजपने केली होती. धान्य हे महाराज..!’ असे ट्वीट करत त्यांनी योगी आदित्यनाथ यांनाही टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!