मुंबई: फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचं आज नवी मुंबई इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ऑनलाईन माध्यमातून या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. सर्व खेळांसाठीचं व्यासपीठ तयार झालं आहे, याचा खूप आनंद आहे. अशी व्यवस्था असणारं कदाचित महाराष्ट्र देशातील पहिलंच राज्य असावं, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
या ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना ठाकरे म्हणाले, फुटबॉल (Football) हा केवळ पायाने खेळायचा खेळ नव्हे, यात देखील बुद्धीचा खूप वापर करावा लागतो. जितका बुद्धीबळ खेळताना करावा लागतो तितकाच यातदेखील बुद्धीचा वापर होतो. या मैदानावर खेळून अनेक चांगले फुटबॉलपटू घडतील, अशी मला अपेक्षा आहे. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, नुसती मैदान बनवून, स्टेडियम उभारुन चालणार नाही, भारताचा संघ फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊन तिथे भारताचा दरारा निर्माण व्हावा, असं आवाहन देखील त्यांनी खेळाडूंना केले आहे.
या मैदानावर लवकरच महिलांची आशियाई फुटबॉल चषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी AFC महिला आशिया चषक भारत २०२२ स्पर्धेच्या स्थानिक कार्यक्रमासाठी सुरक्षा प्रोटोकॉलवर चर्चा केली आहे. त्याननंतरच ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे निवडणूक आयोगाला पत्र; केली ‘ही’ मागणी
“जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा”, नवाब मलिकांचा रवी किशन यांना टोला
‘तृणमूल कॉंग्रेस तर सत्तेवर आली आहे, आता फक्त…’; संजय राऊतांचा टोला
‘गोवाचं ‘कॅरेक्टर’ सुधरवायचं असेल तर…’; संजय राऊतांचे वक्तव्यं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

