Share

राजस्थानचा श्रेयस गोपाल करतोय भारतीय दिग्गज गोलंदाजांची नक्कल; व्हिडीओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल स्पर्धेत राजस्थान संघाची कामगीरी निराशाजनक राहिली आहे. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर राजस्थानने दिल्ली विरुद्ध पुनरागमन केले होते. मात्र त्यांनतर संघाचा महत्वाचा खेळाडू बेन स्टोक्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडल्याने त्यांना धक्का बसला. तिसऱ्या सामन्यात चेन्नई विरुद्ध पराभवाचे तोंड पहावे लागले.

या सामन्याच्या एक दिवस आधी राजस्थान रॉयल्सच्या संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राजस्थानचा गोलंदाज श्रेयस गोपाल हा भारतीय संघाचे दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह, आर आश्वीन आणि हरभजन सिंग यांची नकल करत आहे. या व्हिडीओच्या शेवटी श्रेयस गोपाल म्हणतो की ‘हा व्हिडीओ मी जेव्हा बुमराहला दाखवला तेव्हा त्याने मला सांगीतले की मी त्याच्यापेक्षा चांगले करतो’

गुरुवारी राजस्थानचा सामना हा विराट कोहलीच्या बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघासोबत आहे. आरसीबी संघाने स्पर्धेत आद्याप एकही सामना गमावला नाहीये. तर दुसरीकडे राजस्थाच्या संघाला दोन पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एकीकडे नवखा कर्णधार संजु सॅमसन तर दुसरीकडे भारतीय संघाचे कर्णधारपद भुषवणारा विराट कोहली. त्यामुळे या सामन्यात मानसीक दबाव नक्कीच राजस्थान रॉयल्स संघावर आसेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!