बीड : बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा स्थितीत बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोना वाढत असताना आरोग्य यंत्रणाही तुटपुंजी पडत आहे. या महामारीच्या काळामध्ये केंद्रात सत्तेत असलेल्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी त्यांचा खासदार फंड कोविडे रुग्णांच्या सेवा देणाऱ्या यंत्रणेसाठी खर्च करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी केली आहे.
हिंगे यांनी पत्रकात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात सर्व तालुक्यांना अत्याधुनिक व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर तसेच अत्यावश्यक इंजेक्शनचा पुरवठा आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्रातील राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासोबतच केंद्र सरकारच्या प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी त्यांच्या खासदार फंड चा वापर हा आरोग्य सेवेवर खर्च करणे खूप आवश्यक असल्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंगे यांनी केले.
दरम्यान, रेमडिसीवीरच्या प्रचंड तुटवड्याने रुग्णांचे नातेवाईक ते मिळवण्यासाठी दिवसाची रात्र करत धावपळ करत असताना गेल्या दोन दिवसांपासून बीड शहरासह जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा प्रचंड प्रमाणात जाणवू लागल्याने रुग्णांसह नातेवाईकांचे जीव कंठाशी येऊन बसले आहे. आता ऑक्सिजनसाठी पळापळ करावी लागत आहे. खासगी रुग्णालयेही ऑक्सिजन नाही, तुमचा रुग्ण इतरत्र हलवा, असे सांगू लागल्याने विदारक सत्य समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजप ५० हजार रेमडेसिविर देणारच’, प्रवीण दरेकर भुमिकेवर ठाम
- दैव बलवत्तर! ऑक्सिजन संपण्याच्या ३० मिनिटांपूर्वी पोहोचला टँकर; ५०० रुग्ण बचावले
- विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांना क्लीन चिट
- कोहली विजयाचा ‘चौकार’ मारण्यासाठी तयार, संजू सॅमसन थांबवू शकणार?
- राज्य केंद्रापुढे हतबल; हात जोइून विनंती करतो, आता तरी मदत करा – राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

