मुंबई : मराठी चित्रपटातील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळें यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.
राजेश्वरी या पोस्टमध्ये शेतात चालताना दिसत आहे. त्यासोबतच तिने तिच्या जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे. या व्हिडिओला तिने कॅपशनमध्ये लिहिले आहे. ‘आजोबा जेव्हा हयात होते तेव्हा एके काळी मी शेतात आले होते, त्यानंतर आज बर्याच काळानंतर मी येथे गावी आली आहे. शेतात फिरल्याने आजोबांसोबतच्या बर्याच आठवणी जागी झाल्या आहेत.’
दरम्यान राजेश्वरी सध्या इंस्टाग्रामवर बरीच ऍक्टिव्ह असून रोज नव नवीन व्हिडिओ शेअर करत आहे. राजेश्वरीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे. राजेश्वरीची अदा पाहून चाहते घायाळ होत आहेत. तिच्या व्हिडीओ वरती सध्या लाईक्सचा पाऊस पडत आहे. इंस्टाग्रामवरती राजेश्वरीचे फॉलोवर्स देखील बरेच आहेत.
महत्वाच्या बातम्या
- दैव बलवत्तर! ऑक्सिजन संपण्याच्या ३० मिनिटांपूर्वी पोहोचला टँकर; ५०० रुग्ण बचावले
- विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांना क्लीन चिट
- कोहली विजयाचा ‘चौकार’ मारण्यासाठी तयार, संजू सॅमसन थांबवू शकणार?
- राज्य केंद्रापुढे हतबल; हात जोइून विनंती करतो, आता तरी मदत करा – राजेश टोपे
- आम्ही पाया पडायला तयार पण केंद्राने राज्याला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करावा – राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

