Share

जिल्हांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरही एसटी सुरु राहतील, पण…; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

Published On: 

मुंबई : राज्यात आज (22 एप्रिल) संध्याकाळी आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत. राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून आणखी नियम कठोर करण्यात आले आहेत.

दरम्यान, सार्वजनिक वाहतूक ही सुरु राहणार असली तरी ती फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच असेल असं देखील जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची बससेवा (एसटी) सुरु राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी देतानाच त्याचा उपयोग फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच करता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘नव्या निर्बंधांनुसार, जिल्हांतर्गत, जिल्ह्याबाहेरही एसटी सुरु राहतील, पण त्या केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठीच सुरु राहतील. यासंदर्भात एसटीच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल. परंतु आता सरकारने ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्यानुसार दोन्ही ठिकाणी एसटी चालतील फक्त या एसटी बस अत्यावश्यक सेवेसाठीच चालतील.’ असं अनिल परब म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!