Share

ऑरेंज कॅपमध्ये विदेशी तर पर्पल कॅपच्या शर्यतीत भारतीय खेळाडूंचे वर्चस्व

Published On: 

मुंबई : आयपीएल स्पर्धा सुरु होउन १० दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. आता फलंदाज आणि गोलंदाजात ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी चढाओढ दिसत आहे. बुधवारी झालेल्या सामन्यानंतर जाहीर झालेल्या यादीत भारतीय खेळाडूंचे वर्चस्व दिसुन येत आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पर्पल कॅपच्या शर्यतीत भारतीय खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे.

आयपीएल स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाउस पडला आहे. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत दिल्लीचा सलामिवीर शिखर धवन हा २३१ धावांसह आघाडीवर आहे. तर ग्लेन मॅक्सवेल हा १७६ धावासंह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जॉनी बेअरस्टो हा १७३ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर डुप्लेसीस आणि नितीश राणा हे दोघे १६४ धावांसह चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहे. प्लेसिसचा स्ट्राईक रेट हा राणापेक्षा सरस असल्याने राणा पाचव्या क्रमांकावर आहे.

तर गोलंदाजीत पर्पल कॅपच्या शर्यतीत मात्र पहिले चार खेळाडू हे भारतीय आहे. या यादीत आरसीबीचा युवा खेळाडू हर्षद पटेल ९ गडी बाद करुन अव्वलस्थानी आहे. तर दीपक चाहर, आवेश खान, राहुल चहर हे ८ गडी बाद करत अनुक्रमे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहे. तर पाचव्या स्थानी असलेला अंद्रे रसेल हा ७ गडी बाद करणारा एकमेव खेळाडू या यादीत आहे.

ऑरेंज कॅप ( टॉप ५ फलंदाज) –
१) शिखर धवन (दिल्ली कॅपिटल्स) : २३१ धावा
२) ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) : १७६ धावा
३) जॉनी बेअरस्टो (सनरायझर्स हैदराबाद) : १७३ धावा
४) फाफ डु प्लेसिस (चेन्नई सुपर किंग्स) : १६४ धावा
५) नितीश राणा (कोलकाता नाइट रायडर्स) : १६४ धावा

पर्पल कॅप (टॉप ५ गोलंदाज ) –
१) हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) : ९ गडी
२) दीपक चाहर (चेन्नई सुपर किंग्स) : ८ गडी
३) आवेश खान (दिल्ली कॅपिटल्स) : ८ गडी
४) राहुल चाहर (मुंबई इंडियन्स) : ६ गडी
५) आंद्रे रसेल (कोलकाता नाइट रायडर्स) : ६ गडी

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!