मुंबई : महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
मात्र, सध्या कोरोनामुळे सर्व नागरिक घरी राहूनच महाराष्ट्र दिन साजरा करत आहेत. अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यादिवशी मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/COUU2kcLiak/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर तिने एक फोटो शेअर करत लिहिले आहे, ‘महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा. संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो वा कामगार लढा ही आंदोलनं एकजुटीमुळे यशस्वी होऊ शकली. आपल्या देशावर ओढावलेलं संकट हे एका विषाणूविरोधातील आंदोलनच आहे. त्यामुळे या आंदोलनातही आपण एकजूट दाखवली तर आपलीही या विषाणूविरोधातील चळवळ यशस्वी होईल.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लसीकरणातही मोदी सरकारच्या ढिसाळ कारभाराचे भोग देशाला भोगावे लागत आहेत’
- क्लीन बोल्ड करणाऱ्या नवोदीत हरप्रीत ब्रारला भेटायला गेला कोहली; व्हिडीओ व्हायरल
- ‘अद्यापही बहुतांश दुर्बल घटकांच्या बँक खात्यात जाहीर आर्थिक सहाय्यता निधी जमा झालेला नाही’
- पंजाबकडून रवी बिश्नोईने घेतला पुन्हा एकदा नेत्रदीपक झेल; व्हिडीओ व्हायरल
- नागरिकांना लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत मदत करा; पटोलेंचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन


