🕒 1 min read
मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात आखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारत दिल्ली कॅपीटल संघाचा ३ गडी राखुन पराभव केला. दिल्लीने कर्णधार पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानसमोर १४८ धावांचे लक्ष्य ठेवले. दोन चेंडु बाकी असताना ७ गडी गमावुन राजस्थानने विजय साकारत गुणतालीकेत आपले खाते उघडले.
नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानने दिल्लीच्या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. मागील सामन्यात शतकी सलामी देणारी धवन-शॉ ही जोडी या सामन्यात अपयशी ठरली. जयदेव उडानकटने दोघांनाही बाद करुन राजस्थानला चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर ठरावीक अतंराने दिल्लीचे गडी बाद होत गेले. या दरम्यान कर्णधार रिषभ पंतने एकाकी झुंज देत ३२ चेंडुत ९ चौकाराच्या मदतीने ५१ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर दिल्लीच्या संघाने राजस्थानसमोर १४८ धावांचे लक्ष्य ठेवले.
धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान संघाची यावेळीही सुरुवात चांगली झाली नाही. तसेच मागील सामन्यातील हिरो कर्णधार संजु सॅमसन लवकर माघारी परतला. त्यानंतर मात्र मधल्या फळीतील डेव्हीड मिलरने ४३ चेंडुत ७ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६२ धावांची खेळी करत विजय आवाक्यात आणला. तो बाद झाल्यानंतर अष्टपैलु खेळाडू ख्रिस मॉरीसने १८ चेंडुत ३६ धावांची वादळी खेळी करत राजस्थानच्या संघाला विजयी केले. या विजयासह राजस्थानने या सत्रातील आपला पहिला विजय मिळवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत परभणीतील सन्मती कुरकुटे देशात दुसरा
- संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची मोबाईल व्हॅन करणार कोविड टेस्ट
- वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ‘नीट’ परीक्षा देखील लांबणीवर, केंद्रीय मंत्र्यांची माहिती
- लॉकडाऊनचे नियम पाळुन सरकारला सहकार्य करा : अमित देशमुख
- बिथरलेल्या वृद्धेला पोलिसांचा मदतीचा हात


