🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा प्रभाव पाहता अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये आता वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ परीक्षेचा देखील समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या संबंधीची माहिती दिली आहे.
नीट–२०२१ ही परीक्षा येत्या रविवारी म्हणजेच १८ एप्रिल रोजी होणार होती. देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या परीक्षेला बसतात. यातील अनेक विद्यार्थी कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. तर काहींना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. मात्र, आता ही परीक्षा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ही परीक्षा पुढे कधी होणार या बाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.
In light of the surge in #COVID19 cases,GoI has decided to postpone #NEETPG2021 exam which was earlier scheduled to be held on Apr 18
Next date to be decided laterDecision has been taken keeping wellbeing of our young medical students in mind.@PMOIndia @MoHFW_INDIA #NEETPG
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) April 15, 2021
देशातील तरुण वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करुनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. विशेष म्हणजे परीक्षेसंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झालेली होती. कोरोना नियम पाळून परीक्षा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, देशभर कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- Breaking : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

