🕒 1 min read
लातूर : कोरानाच्या रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात लातूरसह राज्याभरात वाढत आहे, त्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनचे नियम पाळुन सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी औसा रोडवरील नंदा स्टॉप येथील पाहणी दरम्यान केले आहे.
लातूर जिल्हाभरातमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या खुप झपाट्याने वाढू लागली आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी रात्री पुर्ण महाराष्ट्रामध्ये संचारबंदीची घोषणा केली. या घोषणेची अमंलबजावणी १४ एप्रील ८ वाजल्यापासून करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरु नये असे आवाहन देखील देशमुख यांनी केले. ते लातुर शहरातील औसा रस्त्यावरील नंदी स्टॉप येथे संचारबंदीचा पाहणी त्यांनी या वेळी केली.
या वेळी त्यांनी व्यापारी, व्यवसाय करणाऱ्यांशी संवाद साधला. तर .या वेळी अत्यावश्यक सेवा पुरवणारे औषधी दुकाने तसेच अन्न अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांशी देखील देशमुख यांनी चर्चा केली. देशमुख म्हणाले की, सामान्य नागरिकांनी स्वत: च्या आरोग्याची काळजी घ्यावी, घराच्या बाहेर पडू नये, सर्दी, खोकल्याची तक्रार जाणवल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात जावून आरोग्याची तपासणी करुन घ्यावी. नियमीतपणे हात स्वच्छ धुवावेत, सॅनेटायझरचा उपयोग वारंवार करावा, मास्क देखील नियमीतपणे वापरणे गरजेचे आहे. तर सोशल डिस्टंसिंग देखील पाळणे गरजेचे आहे. विनाकारण अफवांवर विश्वास ठेवू नका, स्वत: सह कुटूंबाची देखील काळजी घेण्याचे आवाहन देशमुख यांनी या वेळी केले. यावेळी महापौर, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमहापौर यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- Breaking : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील


