🕒 1 min read
औरंगाबाद : राज्य सरकारने कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी कठोर पाऊले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून आता बिना कामाचे जर कोणी फिरत असेल तर रत्याच्या मुख्य चौकामध्ये मोबाईल व्हॅन व्दारे त्या नागरिकाची कोराेनाची तपासणी करण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासन व पोलिस विभागाच्या सहाय्याने शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आता मोबाईल व्हँनची नजर असणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत औरंगपुरा चौक, रेल्वेस्टेशन चौक, दिल्लीगेट पोलीस चौकी, टिवी सेंटर चौक, आकाशवाणी चौक, महानुभव चौकात विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड टेस्ट करण्यात येणार आहे. अशी माहिती मनपा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही माहिती देखील दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून संचारबंदी लागू केलेली आहे. तरीही गुरुवारी सकाळपासुन विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांचे प्रमाण खुप मोठे होते.
जिल्हा प्रशासन तसेच पोलिस प्रशासन देखील घराच्या बाहेर विनाकारण फिरु नका हे सांगून सांगून थकल्याने मेटाकुटीस देखील आले आहेत. परंतू आता मात्र कोणताही व्यक्ती जर विनाकारण म्हणजेच अत्यावश्यक सेवा वगळता फिरतांना दिसेल, अश्या नागरिकांची आता मोबाईल व्हॅनव्दारे कोरोनाची चाचणी करण्यात येणार असल्याचे आदेश आले आहेत. आता संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा तसेच महत्वाचे तसेच कारण असले तर कामाला जा, अन्यथा ह्या व्हॅनव्दारे तपासणी केल्यानंतर जर पॉझिटीव्ह निघाले असल्याने त्याला दवाखान्यात पाठवण्यात येणार आहे. जर पॉझिटीव्ह आले नसल्यास त्याला आर्थिक दंड देखील लावण्याचा विचार आणी इतर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. महापालिका प्रशासन व पोलिस विभागाच्या सहाय्याने शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आता मोबाईल व्हँनची नजर असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- Breaking : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील


