🕒 1 min read
औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध दि. 14 एप्रिल पासून लागू केले. त्या निर्बंधाची अंबाबजावणी सध्या शहरात सुरू आहे. घरी जाण्यासाठी बिथरलेल्या वृद्धेला नाका बंदी करत असलेल्या पोलिसांनी तिला शांत करत, मास्क देत तिला तिच्या घरी पाठवलेले.
औरंगपुरा भागातील बाजारपेठेत समान आणण्यासाठी आलेल्या वृद्ध आज्जी अचानक वाट चुकून बिथरलेल्या अवस्थेत पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड आणि पोलीस कर्मचारी योगेश नाईक यांच्या निदर्शनास आल्या. त्या आजीने मास्क परिधान केला नहुता. उपनिरीक्षण गायकवाड यांनी सोबत मास्क नेत आजीची विचारपूस केली. त्यांना घरी भावसिंगपूरा भागात जायचे होते. गायकवाड आणि नाईक यांनी त्यांना रिक्षा मध्ये बसवत आजीला त्यांच्या घरी सुखरूप पाठवले.
त्या मुळे महामारीच्या काळात चोवीस तास रस्त्यावर असणाऱ्या पोलिसांची माणुसकी यावेळी दिसून आली. या आधी देखील लॉकडाऊन काळात परीक्षेसाठी आलेल्या परंतु रस्ता चुकलेल्या परीक्षार्थी मुलीला पोलिसांनी वेळेत केंद्रात सोडले होते. आजच्या या पोलिसांच्या कार्याचे कौतुक पोलीस आयुक्तांनी करत सोशल मिडीयावर पोस्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- Breaking : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील


