मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कुटूंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज ठाकरे यांच्या कुटूंबीतील सदस्य आणि त्यांच्या जवळ असणाऱ्या ‘जेम्स’ या ग्रेट डेन जातीच्या श्वानाचे सोमवारी रात्री १२ वाजता निधन झाले आहे. जेम्सला अखेरचा निरोप दिला असून यावेळी ते भावूक झाल्याचं पहायला मिळालं. राज ठाकरे यांच्यासोबत यावेळी कुटुंबीय तसंच पक्षातील नेते आणि समर्थक देखील उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्या घरी विविध प्रजातींची पाळीव श्वानी अनेक वर्षापासून आहेत. राज ठाकरे यांच्याकडे तीन ग्रेट डेन जातीचे कुत्रे होते. २६ डिसेंबर २०१८ रोजी राज ठाकरे यांच्या लाडक्या कुत्र्याचं निधन झालं होतं. साडेबारा वर्षांपासून राज ठाकरेंसोबत असलेल्या ‘बॉण्ड’चं ही निधन झालं होते.
राज ठाकरेंना जेम्सचा लळा होता त्यांचे जेम्ससोबतचे अनेक फोटो देखील सोशल मिडीयावर पहायला मिळतील. यावरून त्यांचे जेम्सवर किती प्रेम होते हे देखील दिसून येते. परंतू वयोमानानुसार जेम्सच्या झालेल्या मृत्यूने राज ठाकरे भावूक झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ठरलं तर मग! यंदाचा टी-20 विश्वचषक युएईमध्येच
- टीम इंडिया श्रीलंकेत दाखल ; तीन दिवस राहणार विलगीकरणात
- औरंगाबादमध्ये मंगळवारपासून नवे नियम, शनिवार- रविवारी पूर्णपणे बंद!
- औरंगाबादेत मनपा आणखी चार पेट्रोल पंप सुरु करणार, मनपा आयुक्तांनी व्यक्त केला निर्धार!
- बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत, उत्कृष्ट बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

