🕒 1 min read
मुंबई : भारतात होणार आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर अखेर बीसीसीआयने अंतिम निर्णय घेतला आहे. निर्धारीत कार्यक्रमानुसार भारतात आयोजीत होणारा हा टी-20 विश्वचषक युएईमध्ये खेळविण्यात येणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही माहिती दिली आहे.
आयपीएल 2021 स्पर्धेत कोरोनाच्या शिरकावामुळे अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. यानंतर भारतात आयोजीत टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर प्रशनचिन्ह उपस्थित झाले होते. 1 जुन रोजी पार पडलेल्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने टी-20 विश्वचषकाच्या आयोजनासाठी 1 महिन्याचा अवधी मागितला होता. तो अवधी संपायला काही दिवस शिल्लक असताना सौरव गांगुलीने याबाबत निर्णय दिला आहे. आयसीसीच्या आगामी बैठकीत याबाबत हा निर्णय कळविण्यात येणार आहे.
मात्र या विश्वचषकाच्या वेळापत्रकाबद्दल अद्यापही कोणतीही माहिती समोर आली नाही. आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक आणि टी-20 स्पर्धेचे वेळापत्रक यांची योग्य नियोजन करणे बीसीसीआयसमोर एक अव्हान आहे. काही दिवसापुर्वी समोर आलेल्या माहिती नुसार टी-20 विश्वचषक स्पर्धा ही 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान खेळवीण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली होती. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळु शकला नाही.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादमध्ये मंगळवारपासून नवे नियम, शनिवार- रविवारी पूर्णपणे बंद!
- औरंगाबादेत मनपा आणखी चार पेट्रोल पंप सुरु करणार, मनपा आयुक्तांनी व्यक्त केला निर्धार!
- बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत, उत्कृष्ट बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी!
- वैजापूर तालुक्यात चोरांचा सुळसुळाट, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण!
- महाराष्ट्रावर डेल्टा प्लस व्हायरसच संकट ; तर ‘ही’ आहे राज्यातील आजची कोरोना स्थिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
