🕒 1 min read
मुंबई : वाशी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरे यांना ६ फेब्रुवारी रोजी वाशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नायाधीश बडे यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला आहे.
मनसे कार्यकर्त्यांनी 2014 मध्ये वाशी टोलनाका फोडला होता. हा टोलनाका फोडण्यास राज ठाकरे यांचं २६ जानेवारी २०१४ रोजीचं प्रक्षोभक भाषण कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी हा टोलनाका बंद करण्याबाबत राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर मनसेच्या गजाजन काळे यांनी काही कर्यकर्त्यांसह लगेच वाशी टोल नाका फोडला होता.
दरम्यान, या प्रकरणात 2018, 2020 मध्येही राज ठाकरे यांच्याविरोधात समन्स आणि वॉरंट काढण्यात आलं होतं. आज ते वॉरंट रद्द झालं आहे. मात्र 6 फेब्रुवारीला राज ठाकरे यांनी कोर्टात उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्यामुळे राज ठाकरे हे न्यायालयात हजर राहणार की नाही, हे महत्वाचं आहे. मनसे आणि आंदोलन यांचं वेगळंच समीकरण आहे. अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी मनसे रस्त्यावर उतरून आपल्या स्टाईलने आंदोलन करत असते. यात अनेकवेळा मनसैनिकांवर गुन्हा दाखल होतो. त्यांच्यावर न्यायालयीन खटले देखील चालतात. वीजबिल, ऍमेझॉन प्रकरणी नुकतंच खळ-खट्याक केलं होतं.
महत्वाच्या बातम्या
- प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथामध्ये ‘राम मंदिरा’ने पटकावला पहिला क्रमांक !
- पुढील काही दिवस आपल्यासाठी आव्हानात्मक; एस.एन.श्रीवास्तव यांचे दिल्ली पोलिसांना पत्र
- १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने जाणार थेट भंगारात; प्रदूषण रोखण्यासाठी नितीन गडकरींचं महत्वाचं पाऊल
- शेतमाल विक्रीचे कसब शेतकऱ्याने अंगिकारले तर निश्चित फायदा होईल : अशोक चव्हाण
- केंद्र पुरस्कृत सिंचन प्रकल्प पुढील दोन वर्षात पूर्ण करणार – जयंत पाटील


