Share

पुढील काही दिवस आपल्यासाठी आव्हानात्मक; एस.एन.श्रीवास्तव यांचे दिल्ली पोलिसांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले. देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

जगभरातून या हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला जात आहे. या लाजिरवाण्या घटनेमुळे भारताची मान शरमेने झुकली असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 26 जानेवारीच्या रात्री तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता राखावी असं आवाहन दिल्लीचे पोलीस आयुक्त एस.एन.श्रीवास्तव यांनी केल होतं.

आता दिल्लीचे पोलीस आयुक्त एस.एन.श्रीवास्तव यांनी दिल्ली पोलिसांसाठी एक संदेश प्रकाशित केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 26 जानेवारी रोजी झालेल्या घटनेत आपण जो संयम दाखवला आहे त्याबद्दल तुमचे आभार. आपल्याकडे संपूर्ण शक्ती होती तरीपण आपण समजदारी दाखवली. आपल्या या संयमतेमुळे आपण या आंदोलनातून बाहेर आलो आहे. आपण अशा अनेक घटनांचा सामना करत आलोय. शेतकरी आंदोलनात जो हिंसाचार झाला त्यामध्ये आपले 394 पोलिस जखमी झाले आहेत. सगळ्यांना चांगल्या पद्धतीचा उपचार मिळत आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की, पुढील काही दिवस आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. त्यासाठी आपल्याला सावध राहणे आवश्यक आहे. मी आपल्या शांततेबद्दल आपले आभार मानतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!