🕒 1 min read
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे चार दिवसीय नाशिक शहराच्या दौऱ्यावर आहेत. ते पक्षाच्या ‘शाखा अध्यक्ष हाच पक्षाचा कणा’ या उपक्रमांतर्गत विविध शाखांना भेट देत आहेत. यातून ते शाखा प्रमुख व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. त्यातून आगामी राजकीय वाटचालीसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सूचना नोंदवून घेत आहेत.
आज मनसेच्या बैठकीपूर्वी अमित ठाकरे आणि रयत क्रांती संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची भेट झाली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. ‘राज ठाकरे शेतकऱ्यांना न्याय देतील’ असा विश्वास यावेळी सदाभाऊंनी व्यक्त केला. सदाभाऊ खोत सध्या शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत नाशिक दौरा करत आहेत. तर अमित ठाकरेही तिथेच आहेत. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते श्री अमित राज ठाकरे यांची नाशिक दौऱ्यादरम्यान भेट झाली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आपण लक्ष घालून प्रसंगी आंदोलन उभारून शेतकऱ्यांना दिलासा देणेबाबत चर्चा करण्यात आली. @RajThackeray @AmitThackeray#नाशिकदौरा pic.twitter.com/XKp9kXDrFF
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) August 28, 2021
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजवला
कोणतेही सरकार हे कायमस्वरूपी नसते, कोण काम करत आहे आणि कोण नाही हे लोक पाहत असतात. ते तेवढे सूज्ञ असतात,’ अशा सूचक शब्दांत अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर शुक्रवारी टीका केली. नाशिकमधून थेट ठाकरे सरकारवर हल्लाबोल करीत अमित यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजवला. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला असून आम्हाला येथे पुन्हा सत्ता मिळवायची आहे. मनसेच्या काळात झालेली कामे व सध्या होत असलेली कामे लोकांसमोर आहेत. नाशिकमध्ये पाण्याचा प्रश्न मनसेने सोडवला. सत्तेत आल्यावर उर्वरित कामे करू, अशी ग्वाही अमित यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नाव राणे असलं तरी चर्चा फक्त चार आण्यांची करतात’, अब्दूल सत्तारांचा टोला
- ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांवर विजय वडेट्टीवार संतापले, म्हणाले..
- ..तर पोलिसांनी भाजपा नेत्यांचे मुसक्या आवळाव्यात, कुठलीही दया दाखवू नये-सचिन सावंत
- ‘नेत्यांना पक्षात घेऊन वापरायचे, हेच भाजपचे धोरण’, जयंत पाटलांची टीका
- ‘विमा कंपन्या आणि केंद्र सरकारमध्येच सेटलमेंट’, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
