Share

..तर पोलिसांनी भाजपा नेत्यांचे मुसक्या आवळाव्यात, कुठलीही दया दाखवू नये-सचिन सावंत

Published On: 

मुंबई : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून देशात करोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे गणेशोत्सवासह, दसरा-दिवाळी हे सण नियमानूसारच साजरे करावे लागतील अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्यात. महाराष्ट्रातही काही निर्बंध शिथिल केलेत. मात्र धार्मिक स्थळे अद्यापही बंद आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने सोमवारी राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० लाख रुग्ण येण्याची शक्यता आहे. नीती आयोगानेही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असतानाही सत्तेच्या हव्यासापोटी आंधळ्या भाजपाला पुन्हा मंदिरांचे राजकारण करायचे आहे. नीती आयोग अनीतिमान शंखासूर भाजपाला समज कधी देणार?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

भाजपचे नेते मंदीरे उघडण्याबाबत व दहिहंडी आयोजित करण्याबाबत आग्रही आहेत. याच दरम्यान भाजपने जनआशिर्वाद यात्राही काढली आहे. त्यावरुन सावंत यांनी निशाणा साधला आहे. ‘जन आशिर्वाद यात्रेत कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत इतके गुन्हे दाखल होऊनही भाजपाचे डोके ठिकाणावर आलें नाही. दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढण्यासाठी भाजपाचे बंगालमधील सत्तेचे राजकारण कारणीभूत ठरले. आता तिसरी लाट लवकर आणण्यासाठी मंदिरे उघडणे व दहिहंडी आयोजनाचा हट्ट करत आहेत,’ असे सावंत यांनी ट्वीटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

कालच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रात उत्सवावर निर्बंध घालावेत असा निर्देश दिला आहे. सुपरस्प्रेडर भाजपा स्वार्थी राजकारणाकरिता जनतेचा जीव धोक्यात घालत आहे. भाजपा नेत्यांनी ऐकले नाही व नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात. कुठलीही दया दाखवू नये असे आवाहनही त्यांनी पोलिसांनी करत भाजपला इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!