Share

‘नेत्यांना पक्षात घेऊन वापरायचे, हेच भाजपचे धोरण’, जयंत पाटलांची टीका

Published On: 

सांगली : प्रत्येकाला पक्षात घेऊन वापरायचे, हे भाजपचे धोरण आहे. तिकडे गेलेल्यांना पश्चात्ताप होईल, हे मी विधानसभेवेळीही सांगितले होते. बाहेरून आलेले बाहेरच बसतात. कोअर कमिटीत त्यांना प्रवेश नसतो असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील भाजपचे नेते वैभव शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, भाजपमधील राज्यभरातील अनेक नेते मला येऊन सांगतात, भाजपमध्ये काही खरे नाही. मराठवाड्यातील अनेक नेत्यांच्या पक्षप्रवेशासाठीही पुन्हा राज्याचा दौरा सुरू करणार आहे. तसेच वैभव शिंदे भाजपमध्ये गेले याचे शल्य होते. तशी वेळ यायला नको होती, असे आजही वाटते. भाजपमध्ये त्यांना चांगली संधी द्या, असे मी माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांना तीनवेळा सांगितले होते. विलासराव शिंदे यांनी माझ्या सर्व निवडणुकांचे सारथ्य केले होते. त्यांनी कधीही मला रागाची जाणीव होऊ दिली नाही. वाळव्याच्या इतिहासात एकत्र येऊन नेहमी प्रगतीची वाटचाल केली.

पाटील म्हणाले की, चुकांतून दुरुस्ती करून मी व वैभव एकत्र आलो आहोत. पुढील पिढी एकत्र येण्यासाठी हे आवश्यक होते. आष्ट्याच्या प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव करण्यास सांगितले आहे. एसटी डेपोसाठीही प्रयत्न करू. आष्टा तालुकानिर्मितीचा सकारात्मक विचार करू. आष्टा व इस्लामपूर नगरपालिकांना आणखी निधी देणार आहोत असे आश्वासन मंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!