Share

‘नाव राणे असलं तरी चर्चा फक्त चार आण्यांची करतात’, अब्दूल सत्तारांचा टोला

Published On: 

पुणे : राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा वाद पेटलेला आहे. शिवसेनेकडून दररोज राणे यांच्या शाब्दिक बाण सोडले जात आहेत. तर राणेही त्यांच्यावर प्रहार करत आहेत. यामुळे राजकीय वातावरण सध्या चांगलेच गरम आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत हे तर राणे यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. पण आता महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही राणेंना लक्ष्य केलेय.

पुणे जिल्ह्यातील आळे ग्रामपंचायतीचं आणि शिवसेना शाखेचं उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडले. ‘केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव भाजपमध्ये फक्त बोलण्यासाठी आहे. त्यांचं नाव जरी राणे असलं तरी ते चर्चा फक्त चार आण्याची करतात, अशी खोचक टीका सत्तार यांनी याप्रसंगी केली.

तसेच, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आणि राणे कुठे? बाळासाहेब ठाकरेंनी नाऱ्यापासून त्यांना नारायण राणेंपर्यंत पोहोचवलं. त्याचं भान त्यांनी ठेवले पाहिजे. पण ते विसरले, असा टोलाही सत्तार यांनी लगावला. भाजपा आमच्या सोबत होता तोपर्यंत ते आंब्याच्या झाडाखाली बसले होते. पण आता राणेंच्या समावेशामुळे ते बाभळीच्या झाडाखाली बसले आहेत. याचे भान भाजपने ठेवले पाहिजे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

तर पुण्यातील हंडेवाडी येथे बोलताना सत्तार म्हणाले, नारायण राणे यांनी आपल्या पदाला शोभेल असे बालावे, मोजके बोलावे. राणे यांनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा शिवसेना त्यांना आपल्या स्टाईलने उत्तर देईल. राणेंनी तोंडावर ताबा ठेवला नाही, तर ईट का जवाब पत्थर से कसा दिला जातो, हे शिवसेनेला शिकवायची गरज नाही, असा निर्वाणीचा इशाराही सत्तार यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!