Share

जेएनयूच्या गेटवर झेंडे, पोस्टर्सवर लिहले भगवा जेएनयू

Published On: 

दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच जेएनयू मध्ये वाद विवाद उफाळून येत आहेत. येथे रामनवमीच्या दिवशी मांसाहारावरून झालेल्या गदारोळावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात हिंसक हाणामारी झाली होती. येथील कावेरी हॉस्टेलमधील मांसाहारावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वाद निर्माण झाले होते. त्यानंतर या वादाने हिंसक वळण घेतले होते. यामुळे येथे चांगलेच वातावरण तापले आहे.

आता आणखी एक वादग्रस्त प्रकरण समोर आले आहे. आता जेएनयूच्या मुख्य गेटवर, कॅम्पस आणि त्याच्या भिंतीभोवती भगवा झेंडा आणि पोस्टर्सवर भगवा जेएनयू लिहण्यात आले आहे. जेएनयूच्या मुख्य गेटवर भगवा झेंडा लावण्यात आले आहे. हा भगवा झेंडा आणि पोस्टर्स हिंदू सेनेच्या संघटनेने लावले आहेत. या पोस्टर्स आणि झेंड्यावरून जेएनयूमध्ये नव्याने वादाला तोंड फुटले आहे.

राम नवमीच्या दिवशी झालेल्या हिंसक घटनेवर केंद्रीय शिक्षण संस्थेने जेएनयूकडून अहवाल मागितले आहे. तर विद्यापीठ विद्यार्थी संघटनेने या प्रकरणी हायकोर्टच्या निवृत्त न्यायाधीशाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. यामुळे जेएनयूचे वातावरण पुन्हा एकदा तापलेले आहे, डाव्या आणि उजव्या विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!