मुंबई : पायाचं दुखणं वाढल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख – अध्यक्ष राज ठाकरे उद्या, म्हणजेच ३१ मे रोजी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल होणार आहेत. येथे राज ठाकरे यांच्यावर सुरुवातीला शस्त्रक्रियेपूर्वीच्या काही चाचण्या केल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच १ मे रोजी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे.
आपल्या पायाच्या दुखण्याबाबत राज ठाकरे यांनी पुण्यातील गणेश कला क्रीडा संकुल येथील सभेत माहिती दिली होती. अयोध्या दौरा रद्द करण्यामागे राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे हे देखिल एक कारण असल्याचे बोलले जात होते. अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर १ जून रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे ही शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. त्याआधी उद्या म्हणजेच ३० मे रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रियेपूर्वीच्या चाचण्या केल्या जातील. त्यांनंतरच १ जून रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांना विरोध, हनुमान चालीसा आंदोलन, अयोध्या दौरा या सर्व घडामोडींमुळे राज ठाकरे कायम चर्चेत आले होते. मात्र त्याच वेळी उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार बृजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध केला. उत्तर प्रदेशमध्ये यायचे असेल तर अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवू देणार नाही, अशी ठाम भूमिका भाजप खासदाराने घेतली. माझा दौरा होऊ नये यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असा आरोप करत राज ठाकरे यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

