🕒 1 min read
नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर निघाले आहेत. यावेळी मुंबई ते नागपूरचा प्रवास त्यांनी रेल्वेने केला असून रेल्वे प्रवास करत ते नागपुरात दाखल झाले आहेत. राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांसोबत नागपूर येथे बैठक घेणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पाश्वभूमीवर ही बैठक होणार असून हा दौरा देखील त्यासाठीच आहे.
राज ठाकरे नागपुर येथे दाखलः
22 सप्टेंबर पर्यंत म्हणजे पाच दिवस राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी कोणत्या राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरलं असून फक्त नागपूर जिल्ह्यामध्ये राज ठाकरे भेट देणार नसून अनेक जिल्ह्यांमध्ये भेट देणार आहेत.
सशस्त्रक्रिया झाल्यानंतर हा त्यांचा पहिला दौराः
दरम्यान, राज ठाकरे यांची काही महिन्यांपूर्वी सशस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर त्यांना आराम करण्यासाठी सांगण्यात आलं होत. मात्र, सशस्त्रक्रिया झाल्यानंतर हा त्यांचा पहिला दौरा आहे. मनसेची ताकद वाढवण्यासाठी राज ठाकरेंचा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जातोय.
महत्वाच्या बातम्या :
- Lips Hacks | ‘या’ नैसर्गिक पद्धतीने शस्त्रक्रियेविना ओठ बनवा फ्लफी..जाणून घ्या!
- Sharad Pawar | “एकच मुलगी मग अग्नी कोण देणार?”, प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले…
- Cabinet expansion । दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?; ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
- Uddhav Thackeray | “…मग दाखवतो शिवसेना काय आहे ते”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर हल्ला
- Shivsena। ठरलं! ‘या’ मैदानावर होणार आता शिंदे गटाचा दसरा मेळावा; दसरा मेळाव्यासाठीचा अर्ज पालिकेने स्विकारला?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
