मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादाचा आरोप लावल्यापासून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या जन्मापासून जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली. हे सगळ्याच पक्षांना माहिती आहे परंतु मी एकटा बोललो. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा मूळ विचार हवाय. जातीपातीच्या राजकारणातून आपण बाहेर पडलं पाहिजे असं विधान राज ठाकरेंनी केले होते.
राज ठाकरेंच्या आरोपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान आता यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे. यावर बोलताना ते म्हणाले कि, ‘ राज ठाकरे यांनी शरद पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओ हा कार्यक्रम घेतला होता, तेव्हा पवारांसोबत दौरे करत होते. तेव्हा त्यांना पवारांबद्दल कळलं नाही का?, राज यांना भाजपसोबत सलगी करायची आहे. पण त्यांनी परप्रांतियांबाबत जी भूमिका मांडलेली आहे.
त्यावर भाजप आडून बसला आहे. ते धुवून काढण्यासाठीच ते राष्ट्रवादीला टार्गेट करत असावेत. त्यांनी एकत्र यावेत, दोघांनी एकत्र संसार करावा पण राष्ट्रवादीला बदनाम करण्याची गरज काय?’ असा सवालही मुश्रीफ यांनी केला आहे. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथे राज ठाकरेंचा आरोपाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुळे म्हणाल्या की, ‘हे दडपशाहीचं सरकार नाही. प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे. अशा बोलण्यान ते काय खरे होत नाही.’ असे त्या म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी ‘ठाकरे सरकार’ विरोधात ‘शिवसेना’ रस्त्यावर!
- ‘गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
- खासदार नवनीत राणांवर मानहानीचा दावा ठोकणार, यशोमती ठाकूर यांचा इशारा
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- पोलिसांना दिलेले चॅलेंज अंगलट! बैलगाडी शर्यत प्रकरणी पडळकरांसह ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

