Share

राज ठाकरे भरकटलेले नेते, त्यांना कधीही शरद पवार होता येणार नाही – विद्या चव्हाण

Published On: 

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज पुण्यात सभा पार पडली. दरम्यान सभेपूर्वी मनसे नेते गजानन काळे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे. म्हणाले, अजित दादाने भाजपसोबत छय्या छय्या केले, तुम्ही फोन बंद करून ठेवले असा टोमणा यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंना मारला. यानंतर राज ठाकरे यांनी मंचावर हजर होऊन भाषणाला सुरुवात केली. यावेळी बोलताना सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी शरद पवारांना टीका केली. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरे यांनी सभेची सुरुवात करतानाच शरद पवारांवर टीका करत केली असल्याने आता राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. “राज ठाकरे हे भरकटलेले नेते आहेत, त्यांना कधीही शरद पवार होता येणार नाही. शरद पवारांना समजून घेण्यासाठी त्यांची 4- ५ पुस्तके वाचा. शरद पवारांवर टीका करून अनेक नेते मोठे झाले आहेत”, असे जोरदार प्रत्युत्तर विद्या चव्हाण यांनी दिले आहे. त्या साताऱ्यात बोलत होत्या.

राज ठाकरेंनी शरद पवारांवर कोणती टीका केली?

मागील विधान सभा निवडणुकीत राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत होता. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांना सभा रद्द कराव्या लागल्या. शरद पवार यांनी त्यावेळी साताऱ्यात आपण इतर नेत्यांपेक्षा वेगळे का आहोत, हे दाखवून दिले. सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, याठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. त्यावेळी शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण ठोकले होते. या पाश्वर्भूमीवर राज ठाकरे यांनी आज “निवडणूका नाहीत उगाच भाषण भिजत कशाला असे म्हणत  शरद पवार यांच्यावर जोरदार टोला लगावला”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!