पुणे : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. यानंतर राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक देखील झाली. या पाश्वर्भूमीवर शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद चांगलेच पेटलेले पाहायला मिळाले. एवढा राडा झाल्यानंतर लडाखमध्ये राणा दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. यावरून आज राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत शिवसेनेवर जोरदार घणाघात केला.
राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणायला गेले. ती काय मशीद आहे का? त्यांना अटक केली. मधु येथे आणि चंद्र तिथे असे अटक झाले. नंतर त्यांना सोडण्यात आलं. शिवसेनेकडून त्यांना वाट्टेल ते बोललं गेलं. एवढा राडा झाल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांना या गोष्टीचं काहीच वाटत नाही? असा प्रश्न यावेळी राज ठाकरेंनी उपस्थितीत केला.
हनुमान चालीसा पठण प्रकरण –
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी समर्थन केले होते. त्यानंतर राणा दांपत्यानी २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यापूर्वीच शिवसैनिकांनी राणा दांपत्याच्या घराबाहेर जाम ठोकला होता, हनुमान चालीसा पठन प्रकरणी राणा दाम्पत्याला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर ते जामिनावर बाहेर आले आहेत.
महत्वाच्या बातम्या –


