Share

IPL 2022 SRH vs PBKS : आज साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात हैदराबाद-पंजाब आमने-सामने

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये प्लेऑफचे चार संघ निश्चित झालेले असताना सहा संघांचे आव्हान संपलेले आहे. यंदाच्या हंगामातील ७०वा सामना पंजाब आणि हैदराबाद यांच्यात आज अखेरचा साखळी सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ एकमेकांमधील क्रमवारी निश्चित करेल, एवढेच महत्त्व या सामन्याला असणार आहे.

स्पर्धेच्या प्लेऑफ,आधील संघ निश्चित झालेले असताना शिल्लक राहिलेल्या अखेरच्या सामन्याला डेड रबर असे म्हटले जाते. आजचा हा सामना त्याच धर्तीचा आहे. विजय मिळवून यंदाच्या मोसमाची विजयाने सांगता करणे, हेच उद्दिष्ट उद्या दोन्ही संघांसमोर असणार आहे.

अखेरचा सामना असल्यामुळे दोन्ही संघातील राखीव खेळाडूंना उद्या संधी दिली जाऊ शकते. हैदराबादला तर नवा कर्णधार निवडावा लागणार आहे. मुंबईविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर केन विल्यमसन मायदेशी रवाना झाला होता. निकोलस पुरन हा त्यांचा नवा कर्णधार असू शकेल. पोलार्डने निवृत्ती जाहीर केल्यामुळे वेस्ट इंडिजच्या मर्यादित षटकांच्या कर्णधारपदी पूरनची निवड झालेली आहे.

शेवटच्या औपचारिक सामन्यात पंजाब संघातही कर्णधार बदल अपेक्षित आहे. एरवी सलामीला खेळणारा मयांक अगरवाल फॉर्मात नसल्यामुळे शिखर धवनकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. आयपीएल २०२२ गुणतालिकेत दोन्हीही संघ ७ आणि ८ व्या स्थानावर आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!