Share

कान्स चित्रपट महोत्सवात हीना खान गोल्डन गर्ल च्या भूमिकेत आणि फोटो व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  जगातील सगळ्यात जुना ७५ वा कान्स चित्रपट महोत्सव सुरु आहे. या महोत्सवासाठी अनेक प्रसिद्ध कलाकारांनी कान्समध्ये हजेरी लावली. यामध्ये हीना खानने देखील हजेरी लावली. अलीकडेच तिचे कान्स चित्रपट महोत्सवातील काही फोटो समोर आले आहे. चाहते हे फोटो पाहून अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. हीना खानचे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपले सौंदर्य दाखवण्यात हिना खान बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये मागे नाही. हीना खान ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे. ती कायम तिच्या सौंदर्याने बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत असते. तिची स्टाईल बॉलिवूड अभिनेत्रीनपेक्षा कमी नाही. यामुळे ही अभिनेत्री मालिकांपेक्षा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडे वळली आहे. तिचा लुक आणि तिची स्टाईल यामुळे ती चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

दरम्यान  कान्स चित्रपट महोत्सवातुन तिचा नवीन लुक समोर आला आहे. फोटोंमध्ये हिना गोल्डन ऑफ शोल्डर बॉडी फिटेड ड्रेसमध्ये दिसत आहे. हिनाच्या एकूण लूकचे वर्णन केले असता, थाई हाय स्लिट गोल्डन ऑफ शोल्डर गाऊनमध्ये बनच्या स्वरूपात केस बांधले आहेत. याचबरोबर मरून लिपस्टिक आणि मोठया आकाराचे कानातले. या लुकमुळे हीना खुप सुंदर दिसत आहे. सामान्य लोकांबरोबर सेलिब्रेटी देखील तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!