🕒 1 min read
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे. यावरून भाजप त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत असताना दिसत आहे. नवनीत राणा यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
नवनीत राणा यांची टीकाः
संभाजी ब्रिगेडचं काम जोरदार आहे. त्यांना उभा महाराष्ट्र जाणतो, पण उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही. दम असता तर ते घरात बसले नसते, अशी खोचक टीका नवनीत राणा यांनी केली होती.
सुषमा अंधारे यांचं उत्तरः
याच दार त्याच दार बाई माझ्या तोंडात मार आमच्या गावाकडे अशी एक म्हण आहे असं म्हणत आपला मतदारसंघ सोडून दारोदार हनुमान चालीसा म्हणत फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी राहून संपूर्ण राज्याला कोरोना सारख्या महामारीतून वाचवनही जास्त पुण्याचा काम आहे आणि ते उद्धव साहेबांनी चोखपणे पार पाडले असं म्हणून सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Alia Bhatt | बाॅयकाॅट ब्रह्मास्त्र दरम्यान आलिया भट्ट हिला दिलासा, ‘हा’ हॅशटॅग ट्रेंडींग
- Ravi Rana vs Bacchu Kadu | रवि राणा आणि बच्चू कडू यांचा वाद पुन्हा चव्हाट्यावर
- IND vs PAK: “जेव्हा काँग्रेस आणि भाजपचे नेते एकत्र…” ; भारत-पाक सामन्यापूर्वी प्रियांका गांधींनी सांगितली जुनी गोष्ट
- Shahajibapu Patil | “जे खोके घ्यायचे, तेच आता बडबडताय…”, शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना गटावर साधला निशाणा
- Nilesh Lanke | ज्याचं बँकेत अकाउंट नाही त्याच्यामागे ईडी लागते – निलेश लंके
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
