कोल्हापूर : काल (२ एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेला आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत असतांना शरद पवार म्हणाले की,‘बरेच वर्ष राज ठाकरे भूमिगत झाले होते. परंतु, ठाकरे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात यायला उत्सुक आहेत हे त्यांच्या कालच्या सभेत दिसले. त्यांचे हेच वैशिष्ट्य असून ते दोन चार महिने भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन चार महिने ते काय करतात हे मला माहीत नाही’, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘राज ठाकरेंच्या तोंडाला कुणीही मर्यादा आणू शकत नाही. उत्तर प्रदेशचे कौतुक करायला त्यांना काय दिसले मला माहीत नाही. लखीमपूरमध्ये शेतकऱ्याची हत्या झाली. उत्तर प्रदेशच्या सीमेवर शेतकरी वर्षवर भर बसले होते. त्यांची सोडवणूक केलं नाही. कितीतरी गोष्टी सांगता येतील त्या उत्तर प्रदेशात घडल्या. परंतु, अशा प्रकारची राजवट उत्तम आहे असे राज ठाकरे म्हणत असतील तर मला त्यावर भाष्य करायचं नाही.’
महत्वाच्या बातम्या
- जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार – राज ठाकरे
- “मला यूपीएच्या अध्यक्षपदात काहीच रस नाही” – शरद पवार
- अभिनेत्री ‘मलायका अरोरा’चा कार अपघात; मनसेच्या नेत्याने केले रुग्णालयात दाखल
- राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले,“त्यांच्या तोंडाला कुणीही मर्यादा…”
- “निवडणुका जिंकल्या, पण देश ‘आनंदी’ राहिला नाही” – संजय राऊतांचा भाजपला टोला


