मुंबई : अभिनेत्री मलाइका अरोरा हिच्या गाडीचा पनवेलनजीक अपघात झाला आहे. तिच्या ड्राइवरचा गाडीवरील ताबा सुटून राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यावरून जात असणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या तीन-चार गाड्यांना अभिनेत्री मलाइका अरोरा हिच्या गाडीने धडक दिली आहे.
या घटनेत अभिनेत्री मलाइका अरोरा हिच्या डोक्याला दुखापत झाली असून, तिला नवी मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मनसे कोल्हापूरचे संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे यांनी मलायकाला रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी दिली.
राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यावरून मुंबईकडे आम्ही निघालो असताना पनवेल नजीक मलाइका अरोरा यांच्या गाडी वरील ड्रायव्हरचा ताबा सुटून मनसेच्या गाड्यांना अरोरा यांच्या गाडीने धडक दिली. या घटनेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :

