Share

“मला यूपीएच्या अध्यक्षपदात काहीच रस नाही” – शरद पवार

Published On: 

कोल्हापूर:  यूपीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. पवारांना यूपीएचे अध्यक्ष करण्याचा ठरावही राष्ट्रवादीच्या युवक आघाडीने केला. परंतु, या विषयावर शरद पवार यांनी आज पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. म्हणाले, मला यूपीएच्या अध्यक्षपदात काहीच रस नाही.

त्यामुळे यूपीएचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आणि पर्यायाने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडेच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे. पवार यांनी यूपीएच्या अध्यक्षपदात रस नसल्याचे सांगितले असले तरी देशातील सर्व विरोधकांची एकजूट करण्यासाठी पूर्ण मदत करणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केलं आहे. कोल्हापूर येथे आले असता पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारताना पवारांनी ही खुलासा केला आहे.

पुढे म्हणाले, “मला काही यूपीएचं नेतृत्व नको आहे. आमच्या तरुणांनी ठराव केला. यूपीएच्या अध्यक्षपदासाठीचा. मला त्यात किंचितही रस नाही. मी त्यात पडणार नाही. ही जबाबदारी मी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देण्याचा कुणी प्रयत्न करणार असेल तर त्यांना सहकार्य शक्ती आणि पाठिंबा आणि मदत या सर्व गोष्टीला माझी तयारी आहे”. त्या गोष्टी आम्ही करत असतो, असे शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

“निवडणुका जिंकल्या, पण देश ‘आनंदी’ राहिला नाही” – संजय राऊतांचा भाजपला टोला
“आमच्यासाठी काही करू शकत नसाल तर…”; शरद पवारांच्या वक्तव्यावर चित्रपट निर्माते आक्रमक
“…त्याप्रमाणे मदरशांवर धाडी टाकायला हव्या”; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
“…पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील”; राज ठाकरेंचा इशारा
मुख्यमंत्र्यांच्या “त्या” घोषणेवर राज ठाकरेंची टीका; म्हणाले, “आमदारांना कसली घरं…”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!