🕒 1 min read
मुंबई: संजय राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. म्हणाले, चार राज्यांत विजय पताका फडकवूनही भाजपच्या चेहऱ्यावर आनंद नाही व जनता, देश सुखी नाही. निवडणुका जिंकल्या, पण देश ‘आनंदी’ राहिला नाही, असा सडकून टोला राऊतांनी लगावला आहे.
पुढे बोलताना, “देश जिंकूनही राजा आनंदी नाही. मग प्रजा कशी आनंदी राहणार”? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. संजय राऊत यांनी हा सवाल दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ सदरातून केला आहे. ‘हॅपिनेस इंडेक्स’वरून राऊत यांनी भाजपला चांगलेच चिमटे काढले आहे. देशाचे मोठेपण नेमके कशात असते आणि देशाचा आनंद कशात असतो, यावर एकदा संसदेत चर्चा व्हायला हवी, असेही ते म्हणाले. संसदेतील सर्वच चर्चा आता रटाळ होत आहेत. मोदी भक्तांची संख्या संसदेच्या सभागृहात वाढली आहे. त्यातील अनेकांना विनोदाचे, खिलाडूपणाचे वावडे आहे. त्यामुळे संसदेतील ‘आनंद’ संपला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
तसेच चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष जिंकला. त्याचा आनंद सोहळा साजरा झाला. पण जागतिक आनंदी देशांच्या यादीत भारत 136 व्या स्थानावर घसरला. पाकिस्तान आपल्यापेक्षा वरच्या स्थानावर म्हणजे 121 व्या क्रमांकावर आहे. भाजप जिंकला म्हणजे देश जिंकला, मोदी जिंकले म्हणजे देश आनंदी झाला, असे जग मान्य करायला तयार नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या –

