कोल्हापूर : काल (२ एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेला आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत असतांना शरद पवार म्हणाले की,‘त्यांच्या तोंडाला कुणीही मर्यादा आणू शकत नाही. उत्तर प्रदेशचे कौतुक करायला राज ठाकरेंना काय दिसले मला माहीत नाही. लखीमपूरमध्ये शेतकऱ्याची हत्या झाली. उत्तर प्रदेशच्या सीमेवर शेतकरी वर्षवर भर बसले होते. त्यांची सोडवणूक केलं नाही. कितीतरी गोष्टी सांगता येतील त्या उत्तर प्रदेशात घडल्या. परंतु, अशा प्रकारची राजवट उत्तम आहे असे राज ठाकरे म्हणत असतील तर मला त्यावर भाष्य करायचं नाही’, असे पवार म्हणाले.
दरम्यान, ‘१९९९ ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. परंतु, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवले. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार. आपणच जर जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलो असू तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व घेऊन बसता.’ तसेच राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार आहे, असे राज ठाकरे काल पार पडलेल्या जाहीर सभेत म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार – राज ठाकरे
- “मला यूपीएच्या अध्यक्षपदात काहीच रस नाही” – शरद पवार
- “…त्याप्रमाणे मदरशांवर धाडी टाकायला हव्या”; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
- “आमच्यासाठी काही करू शकत नसाल तर…”; शरद पवारांच्या वक्तव्यावर चित्रपट निर्माते आक्रमक
- “निवडणुका जिंकल्या, पण देश ‘आनंदी’ राहिला नाही” – संजय राऊतांचा भाजपला टोला

