मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल (२५ मार्च) विधानसभेत बोलत असतांना तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला नाही. तसेच या संपावर तोडगा काढण्यास सरकार अपयशी ठरल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले की,‘सरकार एसटीच्या संपावर तोडगा काढण्यात अपयशी ठरलं असं अनिल परबांनी भर विधानपरिषदेत मान्य केलं. खंडणी वसूली सोडून तुमचं सरकार सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे’, असे भातखळकर म्हणाले.
दरम्यान, ‘एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांची मान्यता मिळावी या मागणीवर समितीने सर्वांचे ऐकून घेतले. या संपाचे नेतृत्व करणाऱ्या खोत आणि पडळकरांशी बोललो. तेव्हा त्यांनी पगारवाढीची मागणी केली. तेव्हा आम्ही पगारात पाच हजार रुपये वाढवून दिले. ज्यावेळी पगारात एवढी वाढ केली जाते तेव्हा पगार आठ हजारांनी वाढतो. इतिहासात एवढा पगार कधी वाढला नव्हता’, असेही परब काल विधानसभेत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो ईश्वर”, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला
- किरीट सोमय्या दापोलीकडे रवाना, शिवसेना आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता
- “…याबाबत सत्य सांगणारा ‘पेन ड्राईव्ह’ विरोधी पक्षाच्या घरात बाळंत का झाला नाही?”, राऊतांचा हल्लाबोल
- “…हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?”, केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्यांनी दाखवला प्रतिकात्मक हातोडा; म्हणाले, “…यांना बाहेर घालवणार”


