Share

“अशा लोकांना आमचे आजोबा लवंडे म्हणायचे”; राज ठाकरेंचा संजय राऊतांवर घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (१२ एप्रिल) उत्तर सभा घेतली यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली. सर्व जण गुढी पाडव्याच्या सभेनंतर एकदम चरफडले. एकच पालुपद लावलं की ईडीची नोटीस आली. परत आली तर परत जाईन. तुम्ही जाताय का? नुसत्या मालमत्ता जप्त केल्या तर पत्रकार परिषदेत शिव्या द्यायला लागले. काय तरी पत्रकार परिषदेतली भाषा. वर्तमानपत्राचा संपादक पत्रकार परिषदेत येऊन भ**, चु** शब्द वापरतो. अंगाशी आलं म्हणून हे होतंय. यांच्यासाठी आमच्या आजोबांनी शब्द काढला होता. हे सगळे ‘लवंडे’ म्हणजे काय? पूर्वी जेवायला पत्रावळ्या असायच्या. त्यातला द्रोण वरण-आमटी पडली की लवंडायचं. तसे हे लवंडे, शिवसेनेकडून पडलं की तिकडे लवंडायचं, राष्ट्रवादीकडून पडलं की तिकडे लवंडायचं. त्यामुळे संजय राऊत हे नेमके कुठले हेच कळत नाही. शिवसेना की राष्ट्रवादी? असा खोचक सवाल करत राज ठाकरे यांनी संजय राऊतांना पुन्हा डिवचले.

दरम्यान पाडवा भाषणात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. कालच्या सभेतही त्यांनी यावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृह खात्याला विनंती आहे की, कुठेही तेढ, दंगल आम्हाला निर्माण करायच्या नाहीत. मला तशी इच्छा देखील नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ आम्हाला बिघडवायचं नाही. पण आज 12 तारीख आहे. 12 ते 3 मे महाराष्ट्रातील सर्व मशिदींमधील मौलवींना तुम्ही बोलवून घ्या त्यांना सांगा सर्व मशिदींवरील लाऊड स्पीकर हे उतरले गेलेच पाहिजे. मग 3 तारखेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही. असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. या महाराष्ट्रात जातीचं राजकारण पवारांनी सुरु केलं. ते फक्त शाहू फुले आंबेडकर याचं नाव घेतात पण, शिवाजी महराजांचं नाव घेत नाहीत. कारण शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर मुसलमान मते मिळणार कशी? शरद पवार हे नास्तिक असून त्यांना देवधर्माशी काही देणं घेणं. असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022 CSK vs RCB : चौकार-षटकारांच्या पावसात चेन्नई एक्सप्रेसचा विजयारंभ; रंगतदार मॅचमध्ये बंगळुरूवर सरशी!

IPL 2022 : माइंडबॉब्लिंग..! RCBविरुद्धच्या मॅचमध्ये उडत्या रायुडूनं टिपला ‘अविश्वसनीय’ झेल; VIDEO पाहून हैराण व्हाल!

शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत – राज ठाकरे

“शरद पवार हे नास्तिक, त्यांना धर्माशी देणंघेणं नाही”; राज ठाकरेंचा घणाघात

IPL 2022 CSK vs RCB : उथप्पा-दुबेनं धू-धू-धुतलं..! चेन्नईचं बंगळुरूला २१७ धावांचं आव्हान

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!