मुंबई : आयपीएल २०२२मध्ये नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर चाहत्यांना चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे लीगमधील तुल्यबळ संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात चेन्नईने २३ धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या रॉबिन उथप्पा (८८) आणि शिवम दुबे (नाबाद ९४) यांनी दे-दणादण फटकेबाजी करत बंगळुरूला २० षटकात २१७ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात बंगळुरूकडून दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, शाहबाझ अहमद यांनी आक्रमक झुंज दिली पण त्यांना दोनशेपार जाता आले नाही.
बंगळुरुचा डाव
चेन्नईचा फिरकीपटू महीष थिक्षना याने बंगळुरुला चांगली सुरुवात करू दिली नाही. त्याने बंगळुरूच्या दोन्ही सलामीवीरांना फसवले. कप्तान फाफ डु प्लेसिस (८) जॉर्डनकडे झेल देऊन बाद झाला. तर अनुज रावत पायचीत होऊन तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीला (१) वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने फसवले. ग्लेन मॅक्सवेलने २ चौकार आणि २ षटकारांसह २६ धावांची फटकेबाजी केली, पण रवींद्र जडेजाने त्याची दांडी गूल केली. पदार्पणवीर सुयश प्रभुदेसाई आणि शाहबाझ अहमद यांनी संघाला वेगाने शतकापार पोहोचवले. हे दोघे सामना फिरवणार असे वाटत असताना थिक्षना पुन्हा चेन्नईच्या मदतीसाठी आला. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह ३४ धावांची खेळी केलेल्या प्रभुदेसाई आणि ४ चौकारांसह ४१ धावा केलेल्या शाहबाझची दांडी गूल केली. दी़डशे धावांच्या आत जडेजाने हसरंगाला तंबूत पाठवले. चांगल्या फॉर्मात असणाऱ्या दिनेश कार्तिकने १४ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३४ धावांची खेळी करत आरसीबीच्या आशा जिवंत ठेवल्या, पण ड्वेन ब्राव्होने त्याला बाद केले. बंगळुरूला २० षटकात ९ बाद १९३ धावापर्यंतच पोहोचता आले. चेन्नईकडून थिक्षणाने ३३ धावांत ४ बळी घेतले, जडेजाने ३ फलंदाजांना तंबूत धाडले.
चेन्नईचा डाव
चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (१७) आज पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. आरसीबीकडून पदार्पण केलेल्या जोश हेझलवूडने त्याला पायचीत पकडले. त्यानंतर आलेला मोईन अली (३) सुयश प्रभुदेसाईच्या भन्नाट थ्रोवर धावबाद झाला. पॉवरप्लेपर्यंत चेन्नईने संथ खेळ केला, त्यानंतर सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी जोरकस फटकेबाजी करत धावगती वाढवली. १३व्या षटकात या दोघांनी संघाचे शतक फलकावर लावले. १५व्या षटकात दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. १७व्या षटकात तुफान फलंदाजी करणाऱ्या उथप्पाला मोहम्मद सिराजने जीवदान दिले. सुयश प्रभुदेसाईने उथप्पाचा झेल घेतला होता, पण हा चेंडू नो बॉल ठरला. वेगवान गोलंदाज आकाश दीपने टाकलेल्या १८व्या षटकात चेन्नईने २४ धावा कुटल्या, यात आकाशने ४ वाईड चेंडू टाकले. १९व्या षटकात उथप्पा माघारी परतला. त्याने ५० चेंडूत ४ चौकार आणि ९ षटकारांसह ८८ धावा चोपल्या. शेवटच्या षटकात दुबेला फक्त ५ धावांपासून दूर राहावे लागले. त्याने ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाज ९५ धावा केल्या. २० षटकात चेन्नईने बंगळुरूसमोर ४ बाद २१६ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : माइंडबॉब्लिंग..! RCBविरुद्धच्या मॅचमध्ये उडत्या रायुडूनं टिपला ‘अविश्वसनीय’ झेल; VIDEO पाहून हैराण व्हाल!
- शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत – राज ठाकरे
- “शरद पवार हे नास्तिक, त्यांना धर्माशी देणंघेणं नाही”; राज ठाकरेंचा घणाघात
- IPL 2022 CSK vs RCB : उथप्पा-दुबेनं धू-धू-धुतलं..! चेन्नईचं बंगळुरूला २१७ धावांचं आव्हान
- जयंत पाटलांचा राज ठाकरेंकडून ‘जंत पाटील’ उल्लेख, नक्कल करत म्हणाले…
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

