Share

IPL 2022 CSK vs RCB : उथप्पा-दुबेनं धू-धू-धुतलं..! चेन्नईचं बंगळुरूला २१७ धावांचं आव्हान

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये आज नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर चाहत्यांना चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. रॉयल चॅलंजर्स बंगळुरूविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या रॉबिन उथप्पा (८८) आणि शिवम दुबे (नाबाद ९४) यांनी दे-दणादण फटकेबाजी केली. या दोघांच्या १६५ धावांच्या भन्नाट भागीदारीच्या जोरावर चेन्नईने बंगळुरूला २० षटकात २१७ धावांचे आव्हान दिले. बंगळुरूने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा चेन्नईचा २००वा आयपीएल सामना आहे.

चेन्नईचा डाव

चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (१७) आज पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. आरसीबीकडून पदार्पण केलेल्या जोश हेझलवूडने त्याला पायचीत पकडले. त्यानंतर आलेला मोईन अली (३) सुयश प्रभुदेसाईच्या भन्नाट थ्रोवर धावबाद झाला. पॉवरप्लेपर्यंत चेन्नईने संथ खेळ केला, त्यानंतर सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी जोरकस फटकेबाजी करत धावगती वाढवली. १३व्या षटकात या दोघांनी संघाचे शतक फलकावर लावले. १५व्या षटकात दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. १७व्या षटकात तुफान फलंदाजी करणाऱ्या उथप्पाला मोहम्मद सिराजने जीवदान दिले. सुयश प्रभुदेसाईने उथप्पाचा झेल घेतला होता, पण हा चेंडू नो बॉल ठरला. वेगवान गोलंदाज आकाश दीपने टाकलेल्या १८व्या षटकात चेन्नईने २४ धावा कुटल्या, यात आकाशने ४ वाईड चेंडू टाकले. १९व्या षटकात उथप्पा माघारी परतला. त्याने ५० चेंडूत ४ चौकार आणि ९ षटकारांसह ८८ धावा चोपल्या. शेवटच्या षटकात दुबेला फक्त ६ धावांपासून दूर राहावे लागले. त्याने ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ९५ धावा केल्या. २० षटकात चेन्नईने बंगळुरूसमोर ४ बाद २१६ धावा केल्या.

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज – रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कप्तान), महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महीष थिक्षना, मुकेश चौधरी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज, सुयश प्रभुदेसाई, आकाश दीप.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!