🕒 1 min read
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackrey) औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे यापूर्वीही सांगण्यात आले होते. मात्र आता एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे(Suhas Dashrathe) यांना तडकाफडकी पदावरून काढण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी या बाबत निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यात ही कारवाई झाली आहे. या पार्श्वभूमीवर दाशरथे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची औरंगाबाद शहरात होणारी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात होती. या बैठकीसाठी मंगळवारी संध्याकाळी राज ठाकरे यांचे औरंगाबाद मध्ये आगमन झाले होते. राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर शहरभर झळकले. यामध्ये आघाडीवर होते ते मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे. राज ठाकरे यांचे संभाजी नगरीत स्वागत या आशयाचे बॅनर संपूर्ण शहरभर लावले होते.
मात्र त्यांच्याच या दौऱ्यात दाशरथेंवर मोठे आभाळ कोसळले आहे. कुठलीही पूर्वकल्पना नसतांना दाशरथे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हाकलपट्टी करण्यात आली आहे. मात्र याबाबतचे कारण अजून पर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही. सुहास दाशरथे याआधी शिवसेनेत होते. मात्र त्या ठिकाणीही त्यांना योग्य सन्मान न मिळाल्यामुळे त्यांनी मनसेत जाण्याचा निर्णय घेतला. आता मनसेतही त्यांचा बळी गेल्याने शहरभर चर्चेचा विषय झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का
- ‘आघाडी करुन शिवसेनेने पायावर धोंडा मारुन घेतला, राष्ट्रवादी तर गनतीतच नाही’
- करीना कपूर पॉझिटिव्ह होताच बीएमसीने घर केले सील
- ‘सेनेचा बाण भरकटला, घड्याळाचं टाईमिंग चुकलं आणि जनतेनं काँग्रेसची साथ सोडली’
- विजयाचे आनंदाश्रू! बावनकुळेंची फडणवीसांना मिठी, दोघेही गहिवरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
