🕒 1 min read
नागपूर: नागपूर आणि अकोला-वाशिम विधानपरिषद मतदारसंघाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या दोन्ही जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता कॉंग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेते सडकून टीका करत आहेत. त्याच सोबत कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर चांगलाच निशाणा साधला जात आहे. यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले (Nana Patole) भाजपवर निशाणा साधत म्हणाले, अशा प्रकारचा घोडेबाजार होणं हे लोकशाहीला घातक आहे. जो निकाल आलेला आहे त्या निकालाचे स्वागतच केले जाईल. तसेच पुढे पटोले म्हणाले की, आमचा उमेदवार गरीब होता पण भाजपचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या बलाढ्य होता. या निकालाचे आम्ही स्वागत करत असलो तरी भाजपने जे कृत्य केले त्यातून त्यांचा नैतिक पराभव झाला, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर आता विरोधकांकडून नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. विजयी झालेले भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावणकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी नाना पाटोलेंवर टीका केली आहे. नाना पटोलेंमुळेच काँग्रेसचा पराभव झाला. पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी राहण्यास लायक नाहीत. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी बावणकुळे यांनी केली आहे. यावर प्रतिक्रिया देत पटोले म्हणाले, यावर उत्तर देणं आत्ता काही योग्य नाही मात्र भविष्यात आम्ही नक्की उत्तर देऊ, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने ‘मविआ’चा दारुण पराभव केला’
- मनसेची पहिल्यांदाच मराठवाडास्तरीय बैठक; राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय डोस देणार?
- ‘राज्य चालवण्याची क्षमता ‘मविआ’त नाही, हे या निवडणुकांवरुन दिसून आले’
- ते प्रदेशाध्यक्षपदाच्या लायकीचे नाहीत; विजयानंतर बावनकुळेंचे शरसंधान
- निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
