🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा (Amrita Arora) यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याने बॉलिवूडच नव्हे तर सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. कोरोना पॉझिटिव्ह (corona virus) झाल्यानंतर करीना कपूर खान सध्या होम क्वारंटाईन आहे. शिवाय तिच्या मुलांबद्दल देखील मोठा खुलासा करीनाचे वडिल रणधीर कपूर यांनी नुकताच केला आहे.
सैफ अली खानची पत्नी करीना कपूर खान कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती बीएमसीने (Brihanmumbai Municipal Corporation) सोमवारी दिली आहे. यानंतर आता करीना कपूर खानचे अधिकृत वक्तव्य समोर देखील समोर आले आहे. त्याचप्रमाणे करीना कपूर खानच्या तब्येतीबद्दल तिचे वडिल ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर (Randhir Kapoor) म्हणाले, ‘करिनाला रविवारी सौम्य ताप आणि अंगदुखी होती आणि त्यामुळेच तिची चाचणी झाली, पण आता ती पूर्णपणे बरी आहे. डॉक्टर तिची चांगली काळजी घेत आहेत.
#UPDATE | The residence of Kareena Kapoor Khan has been sealed. She has not given proper information yet but our officers are trying to find out that how many people did come in contact with her: BMC (Brihanmumbai Municipal Corporation) pic.twitter.com/2xlgOHz0YT
— ANI (@ANI) December 13, 2021
तसेच करीना कपूर खानची दोन मुले तैमूर आणि जेह (Taimur and Jeh )यांच्याबद्दल बोलताना रणधीर म्हणाले, ‘करीना सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहे म्हणून मी तिला सांगितले की मुलांना माझ्या घरी पाठव, पण ती म्हणाली तैमूर आणि जेह तिच्यासोबत राहू शकतात. तो तंदुरुस्त आणि तंदुरुस्त असेल तर ठीक होईल. सैफ अली खान यांच्याबद्दल अद्याप काही समोर आले नाही, परंतू करीना तैमूर आणि जेह या दोघांसह होम क्वारंटाईन आहे.
Mumbai | Brihanmumbai Municipal Corporation's health department to conduct COVID19 testing at the apartment building of actor Kareena Kapoor Khan today
Khan who has tested positive for COVID19 has been advised home quarantine. pic.twitter.com/reYaNRlJDQ
— ANI (@ANI) December 14, 2021
दरम्यान कपूर खान आणि अमृता अरोरा बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये हजेरी लावली होती. या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्या सेलिब्रिटींचीही करोना चाचणी करण्यात आली होती. त्या सगळ्यांमध्ये निर्माता सोहैल खानची पत्नी सीमा खान आणि अभिनेता संजय कपूर यांची पत्नी महिप कपूर यांना ही करोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का
- ‘आघाडी करुन शिवसेनेने पायावर धोंडा मारुन घेतला, राष्ट्रवादी तर गनतीतच नाही’
- करीना कपूर पॉझिटिव्ह होताच बीएमसीने घर केले सील
- ‘सेनेचा बाण भरकटला, घड्याळाचं टाईमिंग चुकलं आणि जनतेनं काँग्रेसची साथ सोडली’
- विजयाचे आनंदाश्रू! बावनकुळेंची फडणवीसांना मिठी, दोघेही गहिवरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
