🕒 1 min read
Raj Thackeray | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी उद्यापासून आपण कोकण दौरा सुरू करणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली.
मी नागपुरलाही बोललो होतो, कोणताही लढा प्रस्थापितांच्या विरोधातच असतो, प्रस्थापितांच्या विरोधात दिलेल्या लढ्याला यश आलेलं तुम्ही १९९५ आणि १९९९ मध्ये तुम्ही पाहिलं आहे. त्यामुळे बालेकिल्ले कुणाचे हलत नाहीत, असं काही नसतं, बालेकिल्ले हलत असतात, यापुढेही हलतील, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
यावेळी, पदावरती बसतात पण कधी कुठली गोष्टी काय बोलावं याबद्दल कळत नाही. मागच्यावेळी ते जोतिबा फुले आणि महात्मा फुले यांच्याबद्दल बोलले होते. हे छोटे-छोटे बच्चे तब ये शादी करते, कैसे करते होगे? कैसे म्हणजे पूर्वीच्याकाळी लहान मुलांचं लग्न व्हायचं. कोश्यारींचं अजून नाही झालं, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यपालांवर केला आहे.
दरम्यान, या बाबत बोलताना, मला तर असं वाटतं की अशा लोकांना म्हणजे राज्यपालांनाही कोणी स्क्रिप्ट देतं का? तुमचं सगळं लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत का? बऱ्याचदा महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे असे प्रकार केले जातात, असं राज ठाकरे म्हणाले असून मुर्ख माणसं आहेत. आपल्या महाराजांना याने काही फरक पडत नाही. ही कोण माणसं आहेत? या लोकांना टेलिव्हिजनवर जागा देऊ नका. पण तुम्ही थांबत नाहीत, असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Anil Deshmukh | अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला; ‘या’ दिवशी होणार जामीन अर्जावर सुनावणी
- Raj Thackeray | “राज्यपालांना कोणी स्क्रिप्ट देतं का?”, राज ठाकरेंचा खोचक सवाल
- Aditya Thackeray | “फडणवीसांनी घेतलेल्या ‘त्या’ बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती होती का?”; आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
- Aditya Thackeray | “आम्हाला शेंबडी पोरं, तुम्हाला एचएमव्ही पत्रकार…”, आदित्य ठाकरेंनी घेतला देवेंद्र फडणवीसांचा समाचार
- Aditya Thackeray | “मीडियासमोर ‘त्या’ मुद्द्यावर चर्चा करायला या”; आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
