Share

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला; ‘या’ दिवशी होणार जामीन अर्जावर सुनावणी

Published On: 

🕒 1 min read

Anil Deshmukh | मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सीबीआय (CBI) प्रकरणात जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आजही सुनावणी झाली नाही. यामुळे अनिल देशमुख यांचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली असून २ डिसेंबरला पार पडणार आहे.

सीबीआयने सहाय्यक सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांची प्रकृती खराब असल्याचे सांगितले. त्यामुळेच ते आज न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती दिली.

महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांनी 26 ऑक्टोबर रोजी 100 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी 21 ऑक्टोबर रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

नेमकं प्रकरण काय?

सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईतील बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये बेकायदेशीरपणे स्वत:साठी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी सचिन वाझे यांचा जबाबही नोंदवण्यात आला. त्याचबरोबर अनिल देशमुख हे या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे साक्षीदारांच्या जबाबावरून स्पष्ट होत असल्याचे सीबीआय न्यायालयाने म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!