Share

Raj Thackeray | “राज्यपालांना कोणी स्क्रिप्ट देतं का?”, राज ठाकरेंचा खोचक सवाल

Published On: 

🕒 1 min read

Raj Thackeray | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. एवढंच नाही तर यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यावर टीका केली असून त्यांना खोचक सवाल देखील केला आहे.

यादरम्यान, मी त्या माणसाबद्दल काय बोलावं ते कळतंच नाही. ते अशा एका पदावर आहे की ज्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाहीय, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. राजकारणात असे अनेक लोकं आहेत जी काही पदांवर बसलेली आहेत. असे अनेक माणसं आहेत, ज्यांना पद येते पण पोहोच येत नाही. त्यातली ही माणसं आहे, असं देखील ते म्हणाले.

यावेळी, पदावरती बसतात पण कधी कुठली गोष्टी काय बोलावं याबद्दल कळत नाही. मागच्यावेळी ते जोतिबा फुले आणि महात्मा फुले यांच्याबद्दल बोलले होते. हे छोटे-छोटे बच्चे तब ये शादी करते, कैसे करते होगे? कैसे म्हणजे पूर्वीच्याकाळी लहान मुलांचं लग्न व्हायचं. कोश्यारींचं अजून नाही झालं, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे.

दरम्यान, या बाबत बोलताना, मला तर असं वाटतं की अशा लोकांना म्हणजे राज्यपालांनाही कोणी स्क्रिप्ट देतं का? तुमचं सगळं लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत का? बऱ्याचदा महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे असे प्रकार केले जातात, असं राज ठाकरे म्हणाले असून मुर्ख माणसं आहेत. आपल्या महाराजांना याने काही फरक पडत नाही. ही कोण माणसं आहेत? या लोकांना टेलिव्हिजनवर जागा देऊ नका. पण तुम्ही थांबत नाहीत, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!