🕒 1 min read
Aditya Thackeray | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप (BJP) नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा खूब समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरासमोर नोकरीसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेंबडी पोरं असं म्हणत हिणवलं होतं. पण त्यांच्या याच टीकेचा आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला.
यावेळी, आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला कुणी शेंबडी पोरं म्हणतात, तुम्हाला एचएमव्ही पत्रकार म्हटलं जातं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
कुठेही माफी न मागता, कारभार जसा चालतोय तसा न चालवता मजामस्ती चाललेली आहे. बीएमसीमध्ये टाईमपास टेंडर चाललं आहे. सत्तेची एक वेगळी मस्ती दाखवली जात आहे, असं देखील ते म्हणाले. तसेच कृषीमंत्री महिलांना शिवीगाळ करतात. कुणीही पश्चात्ताप व्यक्त करत नाही. माफी मागत नाही. मुख्यमंत्र्यांकडून कारवाई केली जात नाही, कान टोचले जात नाहीत, असा घणाघात देखील आदित्य ठाकरेंनी केला आहे.
दरम्यान, त्यांचे टीईटी घोटाळा असेल, ओला दुष्काळावरील विधान असेल, अनेक गोष्टी आहेत, शेतकरी मित्रांना कुठेही मदत पोहोचलेली नाही. नुसत्या घोषणेवर घोषणा केल्या जात आहेत. शेतकऱ्यांसाठी खरी मदत अजून पोहोचलेली नसल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | “मीडियासमोर ‘त्या’ मुद्द्यावर चर्चा करायला या”; आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान
- Narayan Rane | दिशा सलायिन प्रकरणावर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Bacchu Kadu | “ठाकरे-पवारांना जमलं नाही ते शिंदे-फडणवीसांनी केलं”, बच्चू कडूंकडून कौतुकाचा वर्षाव
- Narayan Rane | “कोरोनाच्या औषध खरेदीमध्ये किती चोरी केली ते…”; नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
- Chhagan Bhujbal | राष्ट्रवादीत फुट?, “काल आलेल्या पोरांनी…”, छगन भुजबळांचे रोहित पवारांवर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
