Aditya Thackeray | मुंबई : गेल्या दोन महिन्यांत राज्यात वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला याविषयी दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात आहेत. राज्यातील विकास प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच राज्याबाहेर गेल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात असताना विरोधकांनी हे सगळं सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना खुलं आव्हान केलं आहे.
“मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आज पुन्हा एकदा चॅलेंज देतो कारण मला इतरांकडून उत्तर अपेक्षित नाहीय. त्यामुळे मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना पुन्हा चॅलेंज देतो की, मीडियासमोर माझ्यासोबत वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा करायला या”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलंय.
ते म्हणाले, “वेदांता फॉक्सकॉन असेल, मेडिकल डिव्हाईस असेल किंवा इतर हे सगळे प्रकल्प आपल्या राज्यातून गेलेच कसे यावर चॅलेंज करावं. इतर लोकं नुसता आरोप करतात. मध्यंतरी टाटाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महाराष्ट्रात येण्यासारखं वातावरण नाही, असं सांगतिलं. पण त्या उच्च अधिकाऱ्याचं नाव अजून समोर आलेलं नाही. कोण बोललं ते कळलेलं नाही.”
आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत एमआयडीसीच्या तत्कालीन सीईओंनी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या चेअरमनना लिहिलेलं पत्र सादर केलं. माहिती अधिकारांतर्गत हे पत्र आपण मिळवल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. हे इंग्रजीतील पत्र आदित्य ठाकरेंनी यावेळी पत्रकार परिषदेत वाचून दाखवलं. आदित्य ठाकरे यांच्या या आव्हानाला मुख्यमंत्री काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane | दिशा सलायिन प्रकरणावर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Bacchu Kadu | “ठाकरे-पवारांना जमलं नाही ते शिंदे-फडणवीसांनी केलं”, बच्चू कडूंकडून कौतुकाचा वर्षाव
- Narayan Rane | “कोरोनाच्या औषध खरेदीमध्ये किती चोरी केली ते…”; नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
- Chhagan Bhujbal | राष्ट्रवादीत फुट?, “काल आलेल्या पोरांनी…”, छगन भुजबळांचे रोहित पवारांवर संतापले
- Sushma Andhare | “अरेच्च्या विसरलेच, सध्या तुमच्या मताला…”; सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार


