मुंबई : सोनी सबवरील गेली अनेक वर्ष सुरू असलेली लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. मात्र मागील काही दिवसांपासून या मालिकेची कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चा होत आहे. आता गेल्या काही दिवसांपासून जेठालाल साकारणारे दिलीप जोशी आणि टप्पू साकारणारा राज अंदकत यांच्यात वाद झाला असल्याचे समजत होते. त्यानंतर राजला याबाबत विचारले असता त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
https://www.instagram.com/p/CJ6wx0fBL1z/?utm_source=ig_embed&ig_rid=ddbca9ee-129c-4b52-81aa-54d357e27a07
राज दररोज सेटवर उशिरा येतो आणि त्यामुळे अभिनेते दिलीप जोशी यांना शुटींगसाठी तासनतास ताटकळत उभे राहावे लागते, अशा बातम्या समोर आल्या होत्या. राजला सतत उशीरा होत असल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते. मात्र आता दिलीप आणि राज यांनी ही चर्चा चुकीची असल्याचे सांगितले. राज म्हणाले की, ‘मी अशा अफवांकडे लक्ष देत नाही. मी फक्त माझे काम चांगले करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जेणेकरुन प्रेक्षकांना माझे काम आवडेल. लोक फक्त गोष्टी तयार करतात. परंतु मी त्यावर हसतो आणि त्या टाळतो. मी या सगळ्याकडे लक्ष देत नाही. आमचे सर्व काही ठीक सुरु आहे.’ यामुळे आता त्यांचे चाहते यांना पुन्हा एकदा आनंद झाला आहे.
यापूर्वीही जेठालाल आणि तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा यांच्यात मतभेद झाल्याचे वृत्त समोर आले होते. शैलेश लोढा यांनीही या वृत्तांना फेटाळून लावत या अफवा असल्याचे म्हटले होते. शो प्रमाणेच वास्तविक जीवनातही त्यांची आणि दिलीप यांची चांगली मैत्री आहे. दोघांमध्ये कोणतेही वाद नाहीत, असे त्यांनी सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या
- डब्लुटीसीच्या फायनलसाठी कोहलीच्या प्रशिक्षकांची ‘या’ संघाला पसंती
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- अभिनेता जॅकी भगनानी याच्यासह इतर आठ जणांनी लैंगिक छळ केल्याचा मॉडेलने केला आरोप
- ‘पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल’
- अभिनेता आर माधवनची एक खास लव्हस्टोरी…, विद्यार्थिनीशीच केले लग्न


