Share

अभिनेता जॅकी भगनानी याच्यासह इतर आठ जणांनी लैंगिक छळ केल्याचा मॉडेलने केला आरोप

Published On: 

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील नऊ बड्या कलाकरांविरुद्ध बॉलिवूडची गायिका आणि माजी मॉडेलने बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानी आणि प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियन यांची नावं देखील आहेत. मॉडेलने प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियनवर बलात्काराचा आरोप लावला आहे. तर जॅकी भगनानी याच्यासह इतर आठ जणांविरुद्ध छळ केल्याचा आरोप लावला आहे.

या २८ वर्षीय मॉडेलने सांगितले की, आरोपींनी २०१४ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात तिला अनेकवेळा लैंगिक त्रास दिला आहे. अभिनेता जॅकी भगनानी याने वांद्रे येथे मॉडेलचं लैंगिक शोषण केलं आहे. तर निखिल कामत यांनी सांताक्रूझमधील एका हॉटेलमध्ये तिचं शारीरिक शोषण केलं आहे. यासोबतच अन्य सात आरोपींमध्ये टी-सीरीजचे कृष्ण कुमार, टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानचे सह-संस्थापक, अनिर्बान दास ब्लाह, शील गुप्ता, अजित ठाकूर, गुरज्योत सिंग आणि विष्णू वर्धन इंदुरी यांचीही नावं आहेत.

प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियनने माझ्यावर अनेकवेळा बलात्कार केला असल्याचा आरोप मॉडेलने केला आहे. मॉडेलच्या मते, अभिनय क्षेत्रात करीयर करण्यासाठी ती मुंबईला आली होती. पण चित्रपटांत भूमिका मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपींनी तिचा अनेकदा लैंगिक छळ केला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी केली आहे. मॉडेलच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी कलम ३७६ (N), ३५४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!