🕒 1 min read
मुंबई – काल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली असून या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फडणवीस यांनी पवारांची तब्ब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत असले तरीही या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
या सर्व घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय नेते एकमेकांना अशाप्रकारे भेटत असतात, आपल्याकडे तशी परंपरा आहे. शरद पवार यांची तब्येत सध्या थोडीशी खराब आहे. त्यामुळे फडणवीसांनी सदिच्छा भेट दिली असेल, असे राऊत यांनी म्हटले.
या भेटीत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा कानमंत्र सांगितला असेल का, असा प्रश्नही राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी म्हटले की, होय, शरद पवार यांनी फडणवीसांना सत्तेचा कानमंत्र दिला असेल. विरोधी पक्ष अशाचप्रकारे सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत राहिला तर पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल असा टोला देखील त्यांनी यावेळी फडणवीस यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- हेरगिरीचे ट्वीट संभाजीराजेंकडून मागे; वळसे पाटलांच्या फोनमुळे निवळला वाद
- बेस्ट उपक्रमाला पूर्णवेळ महाव्यवस्थापक द्या; भाजपची जोरदार मागणी
- मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा – मलिक
- पवारसाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच फडणविसांनी घेतली भेट; राष्ट्रवादीची सारवासारव
- ‘मुल्क से बढकर कुछ भी नही’ त्या प्रकरणावर मितालीने सोडले मौन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
